Published On : Wed, Jun 26th, 2019

पंधरा दिवसापासून बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त

कामठी:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील जयभीम चौक रहिवासी दहाव्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनी 10 जून ला घरून बेपत्ता झाली होती .पोलिसांनी अखेर या बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात यश गाठले असून या बेपत्ता मुलीला वाशीम जील्ह्यातील मालेगाव मधील कळमेश्वर गावातुन एका आदिवासी म्हाताऱ्याच्या सान्निध्यात असलेल्या मुलीला ताब्यात घेत आई वडिलांच्या स्वाधीन करून कर्तव्यदक्ष भूमिकेतून माणुसकीचा धर्म पाळला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या जाहीर निकालात जयभीम चौक रहिवासी व नूतन सरस्वती शाळेत शिकत असलेली 15 वर्षीय दहावीची विद्यार्थिनी ही पूर्ण विषयात नापास झाल्याचा आलेल्या निकालातून विद्यार्थिनीने मनावर घेत 10 जून ला सकाळी 11 वाजता शिकवणी वर्गाला जाण्याचे निमित्त करून घराबाहेर पडली मात्र बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने घरकुटुंबियांनी चिंता वाढवीत स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून मिसिंग ची तक्रार नोंदविली यानुसार तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी तपासाला दिलेल्या गतीतून व तर्कशक्तीच्या आधारावर रेल्वे स्टेशन वरची सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी , नियंत्रण कक्षाद्वारे समस्त पोलीस स्टेशन ला दिलेली मिसिंग ची जाहिरात आदी तपासयंत्रनेला गती दीली दरम्यान मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे तबबल 15 दिवस पीएसआय मुंडे, पोलीस नाईक प्रमोद वाघ यांनी पुणे, नगर, वर्धा, सेवाग्राम आदी ठिकाणी भेटी घालून तपास करण्यात आला.

शेवटी अकोला रेल्वेस्टेशन वर दिसल्याची माहिती कळताच पोलिसांनी रेल्वेस्टेशन गाठले तेव्हा ही मुलगी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथिल कळमेश्वर गावातील जाणिकराव ग्यानबा डहाके यांच्याकडे असल्याचे कळताच त्यांच्याकडून मुलीला ताब्यात घेण्यात आले.तेव्हा जाणिकराव डहाके हे चाळीसगाव ला असलेल्या स्वतःच्या मुलीकडे 17 जून ला जाऊन 22 जून ला अकोला रेल्वे स्टेशन ला परतले असता भुकेने व्याकुळलेल्या ह्या मुलीने याइस्माकडे मदतीची मागणी करीत आश्रय घेतला व या म्हाताऱ्याने सुद्धा आसरा दिला.


15 दिवसापासून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल, दुययम पोलीस निरीक्षक आर आर पाल, पीएसआय गणेश मुंडे, पोलीस नाईक प्रमोद वाघ यांचे मुलीच्या आई वडिलांनि मनपूर्वक आभार मानले तर या यशाबद्दल भाजप चे पदाधिकारो

संदीप कांबळे कामठी