Published On : Wed, Jun 26th, 2019

नागपूर मेट्रोचे नवीन वेळापत्रक

Advertisement

दिनांक २८ जून पासून अप आणि डाऊन लाईन वर दररोज होणार २५ फेऱ्या
सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरु राहणार मेट्रो सेवा

नागपूर : नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्या तर्फे अप मार्गावर प्रवासी सेवा सुरु करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर,एका आठवड्यातच महा मेट्रो नागपूर दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरु करणार आहे.याचे औपचारिक उद्घाटन दिनांक २८.०६.२०१९ रोजी सकाळी ०८.०० वाजता सिताबर्डी स्टेशन येथून होणार आहे.

प्रस्तावित योजनेनुसार मेट्रोची पहिली फेरी सकाळी ८.०० वाजतापासून सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथून सुरु होईल तसेच खापरी मेट्रो स्टेशनवरून देखील सुरु होईल. प्रत्येक तासावर सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत मेट्रो फेऱ्या नागरिकांकरिता सुरु राहतील. तसेच सिताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ७.००वाजता व खापरी स्टेशन ते सिताबर्डी स्टेशन करिता ८.०० वाजता मेट्रोची शेवटची फेरी होईल.
सध्या सकाळी ८.००, ९.३० आणि ११.०० अश्या ३ फेऱ्या तसेच दुपारी ३.३०, ५.०० आणि सायंकाळी ६.३० वाजता अश्या तीन म्हणजे एकंदरीत सहा मेट्रोच्या प्रवासी सेवा सुरु होत्या.

रिच-१ च्या मार्गिकेवर प्रवासी सेवेमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मुख्यत: मिहान आणि हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिहान सेझ या भागात स्थित कंपन्यांमध्ये ये-जा करणे सोयीचे होणार आहे. मेट्रोची प्रवासी सेवा त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार कार्यरत असावी या करीता बऱ्याच दिवसांपासून मेट्रो प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली होती ती लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे.

महा मेट्रो लवकरच एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि नागपूर विमानतळ दरम्यान शटल सेवा देखील सुरू करीत आहे. ज्यायामुळे मेट्रो ट्रेन आणि विमानतळावरील सेवा जोडल्या जाणार व नागरिकांना देखील सोईचे ठरणार.

मेट्रोच्या वाढत्या फेर्यांमुळे नागरिकांची, विद्यार्थ्यांची तसेच औद्योगिक वसाहतीत कार्यरत कर्मचाऱ्यांना योग्य सेवा पुरविण्याचा महा मेट्रो पूर्ण प्रयत्न करणार आहेत म्हणूनच या मार्गिकेवर प्रवासी वाढण्याचीही संभावना आता वाढीला लागलेली आहे. या मार्गिकेवर राहणाऱ्या आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असे आवाहन नागपूर मेट्रो करत आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने महा मेट्रो नागपूर द्वारे शहराच्या बेलतरोडी भागातून बस सेवा सुरु केली आहे. सदर बस सेवा ही एयरपोर्ट मेट्रो स्टेशन,एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन,न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनला जोडते आणि कर्मचाऱ्यांना कंपनी कार्यालय आणि औद्योगिक वसाहती पर्यत सेवा पुरविते. सदर बस सेवा सकाळी ७.४० मि. पासून सायंकाळी ८.३० मि. पर्यत कार्यरत असते. महा मेट्रो ने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन (एमएमआय) अंतर्गत फीडर सेवा याआधीच सादर केली आहे. सुरु करण्यात आलेली सदर बस सेवा मिहान येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून जवळीक मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन पासून मिहान येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना कार्यस्थळी सोडते.

या आधी घोषणा केल्याप्रमाणे २५ मेट्रो सेवांची वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल :