कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा परिसरातून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहन क्र टाटा एस क्र एम एच 20 डी ई 0782 वर जुनी कामठी पोलिसांनी यशस्वीरीत्या धाड घालून कत्तलीसाठी जात असलेल्या या सात गोवंश जनावरांना ताब्यात घेत नजीकच्या भांडेवाडी येथील गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आल्याची यशस्वी कारवाही आज सकाळी 8 दरम्यान केली
असून या धाडीतून जप्त वाहन किमती 3 लक्ष 50 हजार रुपये व जप्त सात गोवंश जनावरे किमती 70 हजार रुपये असा एकूण 4 लक्ष 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करोत आरोपी वाहनचालक नामे इर्शाद अहमद अन्सार अहमद वय 22 वर्षे रा टेकानाका नागपूर वय गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले.
ही यशस्वी कारवाही डिसीपी निलोत्पल , एसीपी मुंडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, डी बी स्कॉड चे किशोर गांजरे, रोशन पाटील, पवन गजभिये, अंकुश गजभिये, आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी

