Published On : Mon, Jun 22nd, 2020

कळमेश्वर नगर परिषद पाणी पुरवठ्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

नागपूर : कळमेश्वर नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यासाठी चारगाव (चंद्रभागा ) प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव देण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, न. प. उपाध्यक्षा ज्योत्स्ना मंडपे, सिंचन विभागाचे अंभियंता श्री. ढवळे, श्री. गवाणकर उपस्थित होते.

Advertisement

श्री. केदार म्हणाले की, लोकसंख्येच्या तुलनेत आज रोजी नगरपरिषद क्षेत्रात 2.92 दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी चारगाव प्रकल्पाची भिंत वाढवून पाणीसाठी वाढवता येईल का व अन्य कोणता पाणी स्त्रोत या प्रकल्पात वळवता येईल का याचा अभ्यास करून तातडीने प्रस्ताव नगरपरिषदेला द्यावा. शासनस्तरावर प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement