Published On : Wed, Apr 17th, 2019

गोंडेगाव खदान ला अवैध कोळशा टाल वर पोलीसांची धाड

दोन कोळशा ट्रक, कोळशा अशा २५ लाख २२ हजारचा माल जप्त.

नागपुर : – उपविभागीय पोलीस अधिकारी पुजलवार यांनी गोंडेगाव खुली खदान जवळ धाड टाकुन अवैध कोळशा टाल वरून दोन दहाचाकी ट्रक व ६१ टन कोळशा अशा एकुण २५ लाख २२ हजारांचा मुद्देमाल सह पाच मोटार सायकल जप्त केल्या.

मंगळवार (दि१६) ला दुपारी २ वाजता दरम्यान कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार हयानी पोलीस ताफ्यासह गोंडेगाव खुली कोळशा खदान एचओई माती डम्पिंग जवळ अचानक धाड टाकली असता एका अवैध कोळशा टालवार दहाचाकी ट्रक क्र एम एच ४० वाय ३७८६ मध्ये २४ टन भरलेला कोळशा व जमिनीवर १२ टन कोळशा असा एकुण ३६ टन कोळशा व ट्रक किंमत १२लाख ६२ हजार रुपये ट्रक चालक बादल अशोक चवरे वय २६ वर्ष रा हरिहर नगर कांद्री यास अटक केली.

दुसऱ्या अवैध कोळशा टाल वरून दहाचाकी ट्रक एम एच ४० एन ७५६२ मध्ये २५ टन कोळशा किंमत ५० हजार रुपये व ट्रक १२ लाख असा १२लाख ५०हजार रुपये चा माल सह ट्रक चालक उमेश भुषण पहाडे वय ४५ वर्ष रा गोंडेगाव यास अटक केली. ही कारवाई चालु असताना एक ट्रक कोळशा भरलेला व एक खाली ट्रक पसार झाले.


या धाडीत दोन कोळशा दहाचाकी ट्रक, किंमत २४ लाख ६१ टन कोळशा किंमत १लाख २२ हजार रूपये असा एकूण २५ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल सह पाच मोटार सायकल जप्त केल्या असुन दोन ट्रक चालकांना अटक केली व उमेश पानतावणे पसार झाले.

ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, थानेदार चंद्रकांत काळे, ए पी आय प्रमोद पवार, पो कॉ कुरेशी , जोसेफ, राजेंद्र पाली, विरेंद्र चौधरी, जितु गावंडे हयानी सहभाग घेतला. कन्हान पोलसांनी वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश पाल व सुरक्षा रक्षक शिवकुमार कुरिल यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.