Published On : Sat, Jun 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नांदेडमध्ये मध्यरात्री शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांचा वचक; आरोपींची काढली धिंड

Advertisement

नांदेड : जुन्या नांदेड शहरातील चौफाळा परिसरात मध्यरात्री हातात घातक शस्त्रे घेऊन फिरत दहशत पसरवणाऱ्या पाच युवकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

इतवारा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाचही संशयितांचा शोध लावला. यापैकी तीन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित दोन आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती, त्याच भागातून धिंड काढली.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी अशा प्रकारची कठोर कारवाई आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, इतवारा पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.