Published On : Mon, Jan 27th, 2020

मा. पोलीस आयुक्तालय नागपूर शहर तर्फे पोलीस “पर्सन आफ र्द इयर, 2019” सत्कार कार्यक्रम घेण्यात आला

दिनांक 26 जनवरी रोजी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस जिमखाना लाॅन सिव्हील लाईन नागपूर येथे मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॅ. श्री. भूषणकुमार उपाध्याय, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रविद्र कदम, तसेच सर्व पोलीस उपायुक्त यांचे प्रमुख उपस्थितीत नागपूर शहरातील सर्व पो.स्टे. व शाखा तसेच कार्यालयीन कर्मचारी मधील 186 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा ̎ पोलीस पर्सन आफ र्द इयर, 2019̎ हा सम्मान देवून त्याचा सत्कार कार्य क्रम आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे कुटुबियांसह प्रशस्ती पत्र व बक्षिस दवेून गौरविण्यात आले. तसेच अशा प्रकारचे उपक्रम दर वर्षी 15 आॅगस्ट व 26 जानेवारी या दिवशी घेण्यात येणार असल्याचे मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी सागितले.

सदर कार्य क्रमात मा. पोलीस आयुक्त, यांनी सर्व पुरस्कार प्राप्त अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुबिय यांना शुभेच्छा देवून त्यांचे कुटुबांचे आभार मानले. तसेच मा सह पोलीस आयुक्त, श्री रविद्र कदम यांनी देखील उपस्थितांना मार्ग दर्शन करून शुभेच्छा दिल्या.

सदर पुरस्कार प्राप्त काही अधिकारी व कर्मचारी यांनी सदर उपक्रमाबद्दल मा. पोलीस आयुक्त सरांचे आभार मानुन अशा प्रकारचे उपक्रमामुळे नागपूर शहर पोलीस दलात काम करण्यास अधिक जोश व उर्जा निर्माण झाल्याचे मनोगतात सांगितले.

सदर कार्य क्रमास नागपूर शहरातील सर्व पोलीस उपआयुक्त, सर्व सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस निरीक्षक व त्यांचे कुटुबिय असे 400 ते 500 पोलीस अधिकारी व कर्मचारी हे त्यांचे कुटुबियासह कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्य क्रमाची प्रस्तावना मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री गजानन राजमाने यांनी केले. तसेच सुत्र संचालन मा. श्री. विलास सोनवणे सहा पोलीस आयुक्त, (मानव संसाधन विभाग) नागपूर शहर व आभार प्रदर्शन वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री नरेद्र हिवरे, पो.स्टेलकडगंज नागपूर शहर यांनी केले.