Published On : Tue, May 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नागपूर पोलिसांचा सन्मान

Advertisement

नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सोमवारी, १ मे रोजी नागपूर शहर व ग्रामीण भागातील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल डीजीपी मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले आहे.

सिव्हिल लाइन्स येथील पोलिस भवनात झालेल्या या कार्यक्रमाला जॉइंट सीपी अश्वती दोरजे, नागपूर ग्रामीणचे एसपी विशाल आनंद सिंगुरी आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण पोलिसांच्या चार वरिष्ठ निरीक्षकांसह एकूण 27 पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल डीजीपी बोधचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी ही पदके प्रदान करण्यात आली. स्वच्छ रेकॉर्डसह 15 वर्षांहून अधिक काळ दलात योगदान दिल्याबद्दल पोलीस कर्मचार्‍यांना डीजीपी बोधचिन्ह प्रदान केले जाते.

पुरस्कार मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये गुन्हे शाखेचे पीआय ज्ञानेश्वर भेडोकर, वरिष्ठ पीआय धनंजय पाटील, पीआय भरत क्षीरसागर आणि वरिष्ठ पीआय जगवेंद्रसिंग राजपूत, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक पन्नू धनविजय, शहर पोलिस दलाचे एपीएसआय शैलेश थावरे, ग्रामीण पोलिसांचे एएसआय कैलास सवती आणि इतरांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement