नागपूर: कन्हान पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.पोलिसांच्या क्रूरतेवर सर्व स्तरवरुन टीका करण्यात येत आहे.एका प्रकरणात शनिवारी कन्हान पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी नागपूर टुडेशी बोलताना पीडितेचा भाऊ जिगर कनोजिया यांनी माहिती दिली की, पोलिसांनी त्याच्या भावाला कन्हान पोलीस ठाण्यात सहीसाठी बोलावले. मात्र, त्यांनी त्याचा अमानुष छळ केला. परिणामी, त्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
याआधी कन्हान पोलिस स्टेशनमधील पोलिसाने त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले होते.आता पोलिस ठाण्यातील इतर पोलिसही आमच्याकडे 50,000 रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. आम्ही नकार दिल्याने त्यांनी माझ्या भावाला मारहाण केली, असे तो म्हणाला.
पोलिसांनी त्यांना मार हान केलेली नाही त्यानी स्वतः खिडकी वर स्वताचे डोके फोडले व हा इसम ड्रगिस्ट आहे , पोलिसांवर खोटे आरोप लावत आहे – ऍडिशनल एसपी संदीप पखाले