Published On : Mon, Apr 13th, 2020

केरडी शिवारीत गुन्हे शाखा पोलीसा नी जुगार पकडला

चार आरोपीना अटक करून ७८ हजार तीस रूपयांचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – स्थानिक गुन्हे शाखा नागपुर यांनी मिळालेल्या गुप्त माहीती वरून केरडी शिवारात शिताफितीने धाड मारू न जुगार खेळताना चार आरोपीना अटक करित एक दुचाकी, तीन मोबाईलसह ७८ हजार तीस रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रविवार (दि.१२) ला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणचे पोलिस निरिक्ष क श्री.अनिल जिट्टावार यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, लॉकडाउन सुरु असतांना देखील काही इसम केरडी शिवार पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत जुगार खेळत आहे. आदेशानुसार प्राप्त माहितीची योग्य अशी खात्री करुन केरडी शिवारात रेल्वे लाईन लगत सायं.५ वाजता धाड मारून कार्यवाही केली असता, काही इसम ५२ ताशपत्यावर पैशाची बाजी लाऊन हारजीतचा खेळ खेळतांना दिसुन आले. पोलिसांना पाहून ते पळू लागताच पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.


त्यांचे कडून रोख रक्कम ३५०० रू, एक मोटरसायकल, तीन मोबाइल हँडसेट व इतर साहित्य अशा प्रकारे एकूण ७८०३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात १) मोनु रामु यादव वय २८ वर्ष, २) ज्ञानेश्वर सकिंदर खडसे वय ५२ वर्ष, ३) मुकेश परशुराम बन्स्कार वय २८ वर्ष ४) रूपेश सुरेश राऊत वय ३५ वर्ष सर्व रा. कन्हान यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपीवर कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम १८८ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा नागपुरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री.अनिल जिट्टावार यांचे आदेशाने पोउ पनि सचिन मत्ते, हेकॉ राजेंद्र सनोडीया, सुरज परमार, नीलेश बर्वे, नाना राऊत, नापोशि दिनेश आधापुरे, शैलेश यादव, पोशि प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, विपिन गायधने, अमोल वाघ, चालक नापोशि अमोल कुथे यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.