Published On : Thu, Apr 9th, 2020

काटोल शहरात पोलिसांनी वाढविला बंदोबस्त

Advertisement

काटोल :- संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असुन महाराष्ट्र राज्यात व नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने त्याला अटकाव करण्यासाठी मोहीम सुरू केली असून काटोल शहरात पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रशासनाकडून जिवनावश्यक वस्तू किराणा, भाजीपाला खरेदी करण्यासाठी अत्यावश्यक सेवा २४ तास सुरू ठेवणेबाबत शासनाचे आदेश आहेत, परंतु स्थानिक व्यापाऱ्यांनी कुठेही गर्दी होऊ नये व प्रशासनाला सहकार्य करण्याचे उद्देशाने त्यांच्या स्तरावर वेळ ठरविला आहे त्यानुसार सकाळी ७ वाजतापासून दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असुन त्यानंतर मात्र कोणालाही रस्त्यावरून फिरण्याची परवानगी नाही विनाकारण टवाळी करीत फिरणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्यात येत आहे

त्यामुळे शहरातील संपूर्ण रस्ते निर्मनुष्य दिसुन येत असुन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बॅरीकेट्स लावुन येणाऱ्याजाणाऱ्या वाहनचालकांची कसुन चौकशी करण्यात येत आहे चौकशीत अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरताना आढळुन आल्यास कडक कारवाई करण्यात येत आहे तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की जरी अत्यावश्यक जिवनावश्यक वस्तू उदा. किराणा व भाजीपाल्याची दुकाने यांना नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे याचा अर्थ असा नाही की आपण दररोज किराणा दुकानात किंवा भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले पाहिजे तर आवश्यकतेनुसार चारपाच दिवसांचे साहित्य एकदा खरेदी करून नंतर भाजीबाजारात किंवा किराणा दुकानात जाण्याचे टाळावे जेणेकरून गर्दी वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले होते

त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काही टवाळखोरांमुळे इतर लोकांना त्रास होत आहे. सध्या सुरू असलेली टाळेबंदी उठणार की पुन्हा सुरू राहणार हे येणाऱ्या परिस्थितीवरच अवलंबून असणार आहे त्याकरिता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे अन्यथा येणाऱ्या काळात सर्वांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल हे निश्चित तेेव्हा प्रशासन, पोलिस कर्मचारी, आरोग्य सेवेत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच वृतांत आपल्यापर्यंत पोहोचवििण्यासाठी वृत्तपत्रांचेे प्रतिनिधी दररोज झटत आहेत तेव्हा नागरिकांनी आपल्या कुटुंबासह घरी राहून स्वस्थ रहावे व बाहेे निघण्याचे टाळुन सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे व संंपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे