नागपूर:विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलिसांकडून वाहनांची काटेकोरपणं तपासणी सुरू आहे. त्याच धर्तीवर अंबाझरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्पस रोडवर वाहनांची तपासणी करत होते. याच दरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीकडून 15 कोटी रुपये किंमतीचे सोने-चांदी जप्त केले आहे
माहितीनुसार,पोलिसांना तपासणी दरम्यान त्यांना संशयित व्यक्ती आढळून आला.त्याला थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे अंदाजे 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी आढळून आली. ज्याची बाजारातील किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे.संशयित व्यक्तीने योग्य प्रतिसाद न दिल्याने अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी विनायक गाढे यांनी त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. कोट्यवधी रुपयांचे सोने- चांदी नेमके कोणाचे आहेत. या अनुषंगाने अंबाझरी पोलिसांसह निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि आयकर विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.