Published On : Tue, Jun 26th, 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकच्या वार्षिक बैठकीला ते हजेरी लावतील. त्यानंर ते भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील संबोधित करतील. काँग्रेसच्या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ ते संबोधित करणार आहेत. यावेळी मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान मुंबई विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी मोदींचे स्वागत केले .