Published On : Mon, Nov 29th, 2021

नागपुरातील उप्पलवाडी परिसरात प्लास्टिक कंपनीला भीषण आग; तीन गोदाम जळून खाक

नागपूर : नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात अग्नितांडव सुरू असून प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

नागपूर शहराच्या उपलवाडी परिसरात आज सकाळी मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. लागली आहे. कामठी रोड परिसरात प्लास्टिक गोदामाला ही आग लागली. नागपूरच्या कामठी रोड परिसरात ही घटना घडली आहे. अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.

या आगीत तीन गोदाम जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्लास्टिकचे गोदाम असल्याने आग पसरत चालली आहे. त्यामुळे आग विझविण्याचे मोठे आव्हान अग्निशमन विभागापुढे आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement