Published On : Mon, Nov 29th, 2021

MLC ELECTION : नागपूर भाजपाची रणनिती; घोडेबाजार टाळण्यासाठी २६ नगरसेवक गोवा टूरवर

नागपूर : नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगात आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. निवडणुकीत घोडबाजार होऊ नये, यासाठी भाजपाकडून काळजी घेतली जात आहे. संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपाने २६ नगरसेवकांना सहलीसाठी गोव्याला रवाना केले आहे. तर उर्वरित नगरसेवक उद्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

विधानपरिषदेची नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. नागपूर महापालिकेतील भाजप नगरसेवकांचा एक मोठा समूह गोव्यासाठी रवाना झाला आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून भाजपाने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरवले असून त्याअंतर्गत पहिला समूह गोव्याला रवाना झाला आहे.

Advertisement

नागपूर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसकडून छोटू भोयर मैदानात आहेत. निवडणुकीआधी ३४ वर्षे भाजपासोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. पुढे निवडणुकीत छोटू भोयर किंवा काँग्रेसकडून आपले नगरसेवक फोडले जाऊ नये, अशी भीती भाजपाला आहे. त्यामुळेच भाजपा नगरसेवकांना विविध ठिकाणी पाठवले जात आहे.

५५६ मतदारांपैकी कुठल्या पक्षाकडे किती मतदार?

भाजप – ३१४
काँग्रेस – १४४
राष्ट्रवादी – १५
शिवसेना – २५
बसप – ११
विदर्भ माझा – १७
शेकाप – ०६
पिरीपी – ०६
भरिएम – ०३
एमआयएम – ०१
अपक्ष – १०
रासप – ०३
प्रहार – ०१
रिक्त – ०२

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement