Published On : Sat, Jul 27th, 2019

पावसाकरिता माता राणी ला साकडे घालुन वृक्षारोपण

Advertisement

कन्हान : – जय दुर्गा मंदीर हरिहर नगर वार्ड क्र १ कांद्री येथे विधिवत पुजा अर्चना, भजनाच्या कार्यक्रमासह माता राणीला पावसाकरिता साकडे घालुन वृक्षारोपण करण्यात आले.

पावसाळ्याचे दोन महिने होत असुन संपुर्ण पारशिवनी तालुक्यात पाऊस न आल्याने शेती व शेतकऱ्यांची अंत्यत दैना अवस्था निर्माण झाल्यामुळे जय दुर्गा मंदीर व शितला माता मंदीर कांद्री व्दारे जय दुर्गा मंदीर हरिहर नगर वार्ड क्र १ येथे विधिवत पुजा अर्चना करून पावसा करिता साकडे घालुन पत्रकार कमलसिंग यादव, ग्रा प कांद्री सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश चाफले यांच्या हस्ते मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी जय दुर्गा मंदीरांचे भक्त मुरगन तेवर, विजय तेलोते, देवीलाल शर्मा, योगेश विश्वकर्मा, गोवर्धन यादव, कृपाशंकर यादव, कांताप्रसाद समशेर, कमलाकर गायकवाड, बंडु सोनी, जयराम सह महिला मंडळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. सायंकाळी ६ ते १० वाजे पर्यंत शिव मानस भजन मंडळ घाटरोहणा च्या वतीने उत्तमभाऊ सुर्यवंशी व सहकारी पुरूष, महिला मंडळीने भजनाचा कार्यक्रम सादर केला. तंदनतर उपस्थित सर्व मंडळीना अल्पोहार वितरण करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता वामन देशमुख, प्रकाश ढोके, हेमा सव्वाशेरे, अशोक किरपान, प्रदीप सिल्लेवार, प्रितेश मेश्राम, किशोर बावने, नरेश शेळके, ओंमदास लाडे, जयेश कापसे सह जय दुर्गा माता मंदीर व शितला माता मंदीर कमेटी कांद्रीच्या भक्त मंडळीने मौलिक सहकार्य केले.