Published On : Sat, Jul 3rd, 2021

SBI तर्फे स्टेट बँक दिवसानिमित्त वृक्षरोपण

Advertisement

वृक्षरोपण सह त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज – शाखा प्रबंधक मोहन सिंग भाटी

रामटेक -भारतीय स्टेट बँक शाखा रामटेक येथे स्टेट बँक दिवस साजरा करण्यात आला. बेसुमार वृक्षतोड केली गेली त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले. जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदुषणासारख्या, व कोरोना काळात ऑक्सिजन ची कमतरता झाली असून विविध समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे

या सर्व बाबी लक्षात घेत स्टेट बँक दिनाचे औचित्य साधुन भारतीय स्टेट बँक शाखा रामटेक तर्फे नुकतेच कालिदास स्मारक रामटेक, कविकुलगुरू कालिदास, संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे वृक्षारोपण करण्यात आले.

एकूण 100 वृक्ष लावण्यात आले असून आणखी 50 वृक्ष लावनार असल्याचे लक्ष असून पूर्ण वर्षभर लावलेल्या झाडांची संवर्धन देखील करण्याची जबाबदारी स्टेट बँक शाखेने घेतली असल्याचे भारतीय स्टेट बँक शाखा चे प्रबंधक मोहन सिंग भाटी यांनी सांगितले हे विशेष .. दरवर्षी लाखो झाडे लावली जातात, त्याच्यातली जगतात किती? किंवा जगविण्याचे प्रयत्न किती केले जातात, याचा विचार व्हायला हवा! फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचं संवर्धनसुद्धा करणं, ही काळाची गरज आहे.

यावेळी भारतीय स्टेट बँक रामटेकचे शाखा प्रबंधक मोहन सिंग भाटी, उपशाखा प्रबंधक ,पाटील फिल्ड ऑफिसर दिनेश बागडे, अनुप धमगाये, असिस्टंट रोहिणी बागड़े , व इतर अधिकारी व कर्मचारी मंडळी उपस्थित होती. कवी कुलगुरूB संस्कृत विद्यापीठ तर्फे वित्त व लेखा अधिकारी डॉ.रामचंद्र जोशी ,डॉ. सी.जी.विजयकुमार,प्रवीण कळंबे,राजेश चकेनारपुवार आदीनी आपला मोलाचा सहभाग दर्शविला.