नागपूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देत योद्धा ढोल ताशा वाद्य पथक, नागपूर यांच्या वतीने “झाडे लावा, झाडे जगवा” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. २० जुलै २०२५ रोजी वर्धा रोडवरील चिंचभवन परिसरात पथकातील सर्व वादकांच्या हस्ते सुमारे ५० झाडांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात सहभागी झालेल्या वादकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. ताशा वादक श्री. अंकित हनवते यांच्या पुढाकाराने आणि अथक परिश्रमाने हा संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
सामाजिक भान जपत पथकाची पुढाकाराची भूमिका-
केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतेच न राहता सामाजिक बांधिलकी जोपासत योद्धा ढोल ताशा वाद्य पथक वेळोवेळी विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत आहे. पर्यावरण संवर्धनासारख्या महत्त्वाच्या विषयावर कृतीतून संदेश देणं हे त्यांच्या कार्याचं विशेष वैशिष्ट्य ठरतं.
वाद्यपथकाने वृक्षलागवडीनंतर झाडांच्या संवर्धनाची जबाबदारीही घेतल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे चिंचभवन परिसरात हरित पट्टा निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.