Published On : Tue, Jul 16th, 2019

कर्मचारी भविष्य निधी संघठन कार्यालयात वृक्षारोपण

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि कर्मचारी भविष्य निधी संघठन यांच्या संयुक्त विद्यमाने संघठनच्या क्षेत्रिय कार्यालयात मंगळवारी (ता. १६) वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी कर्मचारी भविष्य निधी संघठनचे क्षेत्रिय आयुक्त विकासकुमार होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती भगवान मेंढे, मनपातील शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, क्रीडा समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक नागेश सहारे, नगरसेविका रिता मुळे, स्नेहल बिहारे, क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त २ देवेंद्र सोनटक्के, सहायक भविष्य निधी आयुक्त निरंजन सरसिया, सहायक भविष्य निधी आयुक्त मिलिंद देऊळकर, सहायक भविष्य निधी आयुक्त अजय भारत, कर्मचारी भविष्य निधी कर्मचारी संघटनेचे सचिव विजय ठाकरे, सक्करदरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत यादव, ईएसआयसी बोर्ड सदस्य मुकुंद मुळे, सक्करदरा ठाण्याचे सुनील सरदार उपस्थित होते.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरात उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लावण्याचा संकल्प नागपूर महानगरपालिकेने केला आहे. वृक्ष लागवडीने शहर हिरवे करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. कर्मचारी भविष्य निधी संघठन कार्यालयाने यात सहभाग नोंदविल्याबद्दल महापौर नंदा जिचकार यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना भविष्य निधी आयुक्त विकासकुमार म्हणाले, पूर्व नागपुरात कार्यालयाच्या माध्यमातून ९०० वृक्ष लागवड करून पूर्व नागपूर हरित करण्याचा संकल्प अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला आहे. संपूर्ण विदर्भातून या कार्यालयात येणाऱ्या पेन्शनर व अन्य व्यक्तींना या झाडांचा लाभ व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

क्रीडा समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक नागेश सहारे यांनी भविष्य निधी संघठन कार्यालयासभोवताल नागरी सुविधा पुरवून सौंदर्यीकरण नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याची विनंती महापौर नंदा जिचकार यांच्याकडे केली.

यानंतर सर्व मान्यवरांनी परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे संचालन अरुणकुमार कुंभारे यांनी केले. आभार विजय ठाकरे यांनी मानले.

Advertisement
Advertisement