Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाझरी येथील सुदाम नगरी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महिला व बाल कल्याण समिती सभपाती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, उपायुक्त व समाज कल्याण अधिकारी डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
महिला व बाल कल्याण समितीने ठरविलेल्याप्रमाणे नागपूर शहरात वृक्षारोपण सुरू केले असून त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटाकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.
कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे चंद्रशेखर पाचोडे, विकास बागडे, धरमपेठ झोनचे विभागीय आरोग्य अधिकारी घोडसकर, तसेच मनपाचे अधिकारी उपस्थित होते.