Advertisement
बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र नारायण गडावरील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या परिसरातील शाळा महाविद्यालयांमधील ११०० विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे वृक्षारोपण केले.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार सर्वश्री विनायक मेटे, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन तसेच वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.