
मुंबई: एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बसस्थानकातील महिला प्रसाधनगृहात आज सॅनिटरी नॅपकिनच्या स्वयंचलित यंत्राचा शुभारंभ चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आला.
अवघ्या २० रुपयात ३ सॅनिटरी नॅपकीनचे पाकिट या स्वयंचलित यंत्रातून उपलब्ध होईल. ५ रुपयांचे ४ कॉईन किंवा १० रुपयांचे २ कॉईन या यंत्रात टाकल्यानंतर सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होतील. एसटी महामंडळ, प्रबोधन प्रकाशन, अक्षय कुमार आणि आदित्य ठाकरे यांच्यामार्फत या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. राज्यातील अजून १० बसस्थानकांवर लवकरच अशी सॅनिटरी नॅपकिनची स्वयंचलित यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
Advertisement








