Published On : Sun, May 31st, 2020

शुद्ध पाण्यासाठी जवाहर नगर वासियां ची १७ वर्षापासुन पायपीट

Advertisement

कन्हान : – नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक ४ मधे एकदम कमी लोकसंख्या व क्षेत्रफळ असलेल्या नागरी वसाहत म्हणून जवाहरनगर प्रसिद्ध आहे. निवड णुकीमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान व महत्त्वाची सक्रिय निर्णायक भुमिका नि भावणारा या नगरातुनच मागील कित्येक वर्षापासून ग्रांमपंचायचे सरपंच, उपसर पंच, तसेच न.प चे नगराध्यक्ष सुद्धा निव डून आलेले आहे. परंतु या जवाहर नगर ची दशा व दिशा बदललेली नाही. येथे कसल्याही प्रकारची पाहीजे तशी सुधा रणा झालेली नाही. या नगरात विकास मात्र दुरच…मागील १७ वर्षापासुन या नगरातील नागरिक शुद्ध पाण्यासाठी ग्रा मपंचायत, नगरपरिषदच्या प्रवास आप ल्या डोळ्यांनी बघत असुन अनेक कामे होऊन सुद्धा नगरला शुद्ध पाणी पिण्या योग्य लाभलेला नाही. जीवनावश्यक व नागरिक सुविधा म्हणुन पिण्याचे पाणी करिता अनेकदा शासनाला, ग्रामपंचाय ती मधील सरपंच, नगरपरिषदेच्या नगरा ध्यक्षा व प्रशासक व मुख्याधिकारी यांना एकुण बारा १२ वेळा निवेदन देण्यात आ ले असुन कित्येकदा नगरसेवकांना व पा णी पुरवठा विभागात मौखिक व वैयक्ति क तक्रार सुद्धा करण्यात आली. या नग रातील नागरिकांनी शुध्द पिण्याच्या पा ण्यासाठी विविध आंदोलने, मोर्चे, केली परंतु या नगरात टॅकर जात नसुन सुध्दा नेत्यांनी खोटे आश्वासन देऊन टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याच्या नावाने आपले खिसे भरलेत.

शुद्ध पाणी पुरवठा करण्यास ग्राम पंचायत, आताची नगरपरिषद असमर्थ ठरलीआहे. मागील माजी नगराध्यक्षांनी ,उपाध्यक्ष व नगरसेवकांनी २०१७-१८ म ध्ये शुद्ध पाणी नक्की मिळेल असा विश्वा स दिला होता.पण ते ही फसवेच निघाले. नगरवासी मात्र हातावर हात ठेऊन माग णी किती वर्ष प्रलंबित राहणार हे बघत आहे. मागिल न.प मध्ये असलेले बिजेपी सत्ताधा-यांनी कित्येकदा तरी या पाण्या च्या समस्यासाठी बैठक व सभा घेतल्या परंतु समस्या काही सुटेली नाही.या वर्षी नगरपरिषद २०१९-२० च्या झालेल्या नि वडणुकीत शिवसेनेच्या महिला अध्यक्षा करूणाताई आष्टणकर बहुमतानी निवडु न विजयी झाल्या. जवाहर नगर ही त्यां ची सासुरवाडी आहे. त्या जवाहर नगरा त राहल्या असल्याने नागरिकांनी त्याच्या कडे अपेक्षा असुन १७ वर्षाचा पिण्याचा पाण्याचा वनवास संपवुन नगरास शुद्ध पाणी पुरवठा करतील का ?

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या उन्हाळ्यात कमी वेळ नळ सोड ल्याने असुध्द पाणी पुरवठा सुध्दा कमी होतो. या नगराची दुर्दशा म्हणा की, दोन पाइपलाइन असुन काही घरांना नवीन पाईप लाईन व काही घरांना जुना पाईप लाईन मधुन पाणी पुरवठा होतो. परंतु शरमेची बाब की दोन्ही पाईपलाईन मधु न गढुळ अशुध्द पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना गॅस,अपचन, एसीडी टी, अस्थीरोग, हृदया च्या अश्या अनेक विविध रोगांनी ग्रासलेले आहे. काही दिव सापासुन तर पाणी खुप अशुद्ध येत असु न फक्त भांडी धुणे व संडासच्या वापरा करिता होतो. असे गढुळ, दुषित पाणी पिण्याकरिता वापरायचे का हीच शोकां तिका आहे.

वर्षातुन ३६५ दिवसांपैकी एकादिवसा आड म्हणजे १७० दिवस पा णी मिळते. तेही अशुद्ध व पिण्यास योग्य नाही मात्र नगरपरिषद नळ टॅक्स, पाणी पट्टी पुर्ण एका वर्षाच्या वसुल करून घेते . या नागरिकांचा आवाज सुद्धा दाबण्या चा प्रयत्न करण्यात आला. परंतु आता नागरिक थकले असुन आरो फिल्टरचे पाणी पिण्याकरिता पैसे खर्च करून वाप रत आहे. नागरिकांनी पाण्याचा टॅक्स प ण द्यायचा आणि शु़ध्द पाणी कॅन माग वायची हा कुठला नगरपरिषदेचा न्याय आहे. यास्तव जवाहर नगरच्या नागरिकां चे नळ टँक्स माफ करावे. या नगरातील आई, बहिणी व पुरूष मंडळी पहाटे स काळी ६ ते ७ वाजता रस्ता ओलाडुन दु सऱ्या नगरातील नळाचे शुद्ध पाणी आ णतात. मग नगरात नळ कनेक्शन कशा साठी दिले आहे. जर का पाणी भरताना रस्ता ओलाडणताना अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जवाब दारी नगर प्रशासन व मुख्याधिकारी यांची राहील.

अशुध्द हिरवे, पिवळे, गढुळ पाण्याच्या समस्यांकडे लक्ष वेधुन शुध्द पिण्याचा पु रवठा युध्द पातळीवर करण्यात यावा. ना हीतर येणाऱ्या काळात जवाहरनगर नाग रिक शुद्ध पाणी पुरवठा करिता आंदोलन किंवा आमरण उपोषन करण्याची भुमि का घेतल्यास नगरपरिषद प्रशासन नगरा ध्यक्षा, पाणी पुरवठा विभाग, सभापती व मुख्याधिकारी यांची सर्वश्री जवाबदारी राहील. असे निवेदन मुख्याधिकारी व पा णीपुरवठा सभापती यांना देण्यात आले. याप्रसंगी सतीश भसारकर, शैलेश दिवे, मयूर माटे, राजकुमार चहांदे, विक्की उके , पायस मेश्राम, सागर ऊके, अनिल राम टेके, गौतम नितनवरे,अजय गणेर, राहुल चांदुरकर, कैलास गेडाम, योगेश नितनव रे, उमराव पाटील, मनीष पाली, मधुकर गणवीर, शंकर माहुरे, निशांत मोटघरे, स तीश पाली सह नगरवासी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement