Published On : Fri, Dec 15th, 2017

ऊर्जा संवर्धनाची माहिती देणाऱ्या चित्ररथाचा

Advertisement


मुंबई: ऊर्जा संवर्धन सप्ताहनिमित्त काढण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धन पुस्तिकेचे प्रकाशन तसेच महाऊर्जाच्या चित्ररथाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन निमित्त 14 ते 20 डिसेंबर या काळात महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण (महाऊर्जा) च्या वतीने ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त या पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या असून 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना याचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी महाऊर्जाची माहिती पुस्तिका, ऊर्जा संवर्धन विषयावरील पुस्तिका, तसेच दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने, महाऊर्जाचे व्यवस्थापकीय संचालक राजाराम माने, विभागीय महाव्यवस्थापक सारंग महाजन, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.

ऊर्जा संवर्धन सप्ताह निमित्त महाऊर्जाच्या वतीने ऊर्जा संवर्धनची माहिती देणारा चित्ररथ सर्व विभागात फिरविण्यात येणार आहे. तसेच सर्व विभागात रोड शो करण्यात येणार आहेत. यासंबंधीचे पोस्टर्स, माहिती पत्रके, पुस्तिका आदींचे वाटपही करण्यात येत आहे.