Published On : Wed, Feb 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

महानुभाव पंथीय वधु-वर परिचय पुस्तक दैवयोग’चे परिणय फुके यांच्या हस्ते विमोचन संपन्न

Advertisement

नागपूर : दि. २/२/२२ महानुभाव पंथीय वधु-वर परिचय पुस्तक ‘दैवयोग’चे विमोचन माजी मंत्री आमदार परिणय फुके यांच्या हस्ते स्वागतनगर येथील श्रीकृष्ण मंदिरात करण्यात आले. यावेळी आचार्य प.पु.प. महंत श्री न्यायंबास बाबा, सकाळचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे, सुधाकर मेंघर, अरविंद भाजीपाले, उदय नागपुरे, म. मुरारीदादा बिडकर, चंदू फलके, पुरुषोत्तमजी ठाकरे, चंदू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले, महानुभाव पंथात सर्व जातींची मंडळी आहेत.

‘दैवयोग’ समाजातील विवाहाच्या समस्या सोडविण्यास सहाय्य ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. व्यसनापासून दूर असलेल्या पंथात सर्व समाजातील वधू-वरांना एकत्र आणण्याचे कार्य होत राहील. या पुस्तकाचे वेगळेपण इतर समाजात वाखणल्या जावे, अशा शुभेच्छा आमदार परिणय फुके यांनी या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी दिल्या.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विविध जातीची मंडळी गुण्यागोविंदाने पंथात एकत्र नांदतात, त्यांना सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टीने समन्वय साधणारा सेतू म्हणून ‘दैवयोग’ने पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन आचार्य प.पु.प.महंत श्री न्यायंबासबाबा यांनी अध्यक्षीय भाषणात केले. पत्रकार प्रमोद काळबांडे शुभेच्छा देताना म्हणाले, महानुभाव पंथ किती विस्तीर्ण आहे, याची झलक पहिल्याच पुस्तकातून दिसून येते. पुर्वी काबुल-कंधारपर्यंत हा पंथ होता, आज उत्तर भारतात मोठ्या संख्येने उपदेशी मंडळी आहेत.

त्यांनाही मोठा फायदा ‘दैवयोग’मुळे होईल. अशा पुस्तकांद्वारे समाज संघटीत राहील. असे व्यक्तव्य म. मुरारीदादा बीडकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम ठाकरे, प्रस्ताविक शुभम सुरकार यांनी केले तर आभार रत्नाकर पोतदार यांनी मानले. ‘दैवयोग’च्या नोंदणीसाठी 8421045100 संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement