Published On : Wed, Mar 10th, 2021

मतदार याद्या शुद्धीकरणासाठी छायाचित्र सादर करावे-तहसीलदार अरविंद हिंगे

कामठी :-नवीन नियमावलीप्रमाणे प्रत्येक मतदारांचा मतदार यादीत छायाचित्र असणे सक्तीचे असल्यामुळे ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र नसतील त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्त्रीय अधिकारी बीएलओ यांचेकडे आपला पासपोर्ट साईज छायाचित्र सादर करून आपले नाव मतदार यादीत निश्चित करून घ्यावे असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

कामठी विधानसभा मतदार संघातील मतदार यादी भागामध्ये 20 हजार च्या वर छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे आहेत म्हणून अशा छायाचित्र नसलेल्या मतदारांनी त्याच्या गावातील, यादी भागातील केंद्रस्तरीय अधिकारी, बीएलओ यांच्याकडे अथवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत लवकरात लवकर छायाचित्र जमा करावेत .

संदीप कांबळे कामठी