Published On : Fri, May 18th, 2018

नागपूरचा इतिहास, विकास आणि परंपरेवर मध्यवर्ती संग्रहालयात छायाचित्र प्रदर्शन


नागपूर: सिव्हिल लाईन्स स्थित मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात शुक्रवारी नागपूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अनुप कुमार यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील हौशी छायाचित्रकारांसाठी जिल्हा माहिती अधिकारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयजिल्ह्याचा इतिहास, परंपरा आणि विकास या विषयांवर एक छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ७५ छायाचित्रकारांनी सहभाग घेतला.

यामध्ये रवी सोनकुसरे यांच्या छायाचित्राला प्रथम तर रणजित देशमुख यांच्या छायाचित्राला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तर अंकित बन्सोड आणि राजकुमार कावळे यांच्या चित्रांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली आहेत. स्पर्धेचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर विभाग यांच्याद्वारे करण्यात आले होते.

Advertisement

नागपूर जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक व पर्यटन स्थळे, सण व परंपरा, पुरातन शासकीय वास्तू तसेच प्रगतीपथावर असलेली किंवा पूर्णत्वास आलेली विकासकामे यांची निराळी छबी स्पर्धकांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहे.—Swapnil Bhogekar

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement