नागपूर :शहरातील सायबर पोलीस विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत शेअर ट्रेडिंग फसवणुकीत तरुणाने गमावलेले ७ लाख २३ हजार पाच लाख रुपये परत मिळवून दिले आहे.
माहितीनुसार, हुकेश्वर येथील २९ वर्षीय रजत भैय्या आसटकर याला मोबाईवर ‘ग्लोबल वर्क ग्रुप’ची जाहिरात दिसली. यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपला शेअर करून लाईक्स केल्यास ६० रुपये मिळतील असे सांगण्यात आले. त्यानंतर रजतच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली.
आरोपी ग्लोबल ग्रुपच्या धारकांनी रजतचा विश्वास संपादन करून शेअर्स ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार राजतकडून आरोपींनी ७ लाख २३ हजार पाच लाख रुपये घेतले. मात्र कधीही नफा परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याला आढळले.
त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर पोलिस स्टेशनचे एपीआय विजय भिसे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्यांनी पैसे कोठून काढण्यात आले होते, त्यांची खाती शोधून ती खाती गोठवली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर रजतच्या खात्यात त्याचे पैसे जमा करण्यात आले आहे.
डीसीपी (डिटेक्शन) निमित गोयल, एसीपी (गुन्हे) अमित डोळस, पीआय सायबर अमित डोळस, पीआय अमोल देशमुख, एपीआय विजय भिसे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन मोरे, पोलीस अधिकारी श्रीकांत गोणेकर, शारदा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची कारवाई करण्यात आली.