नागपूर : राज्यातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.आता या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला.
या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे या सर्व बाबी लक्षात घेता अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. तसेच काही अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत.
या आधी या योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु, आता ही अट काढून टाकण्यात आली असून, ही मर्यादा आता 65 वर्ष करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदेंनी सभागृहात दिली आहे. याशिवाय जमिनीच्या मालकीचीदेखील अट काढण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी पहिले महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती.
मात्र, आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शिवाय जमिनीबाबतची अटही काढूण टाकण्यात आली आहे. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जातील. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसंच, त्यांचं वर्षाला उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असावे अशी आहे.
दरम्यान विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्र –
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
मूळ निवासी प्रमाणपत्र
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
बँकेचे पासबूक
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म