नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सापळ्यातून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले तिघे आरोपी रंगेहात पकडले. तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. पोलिसांनी या आरोपींकडून घातक शस्त्रांसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ११.५१ दरम्यान मानेवाडा, बेसा रोड परिसरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना राधानंद नगर, जगन्नाथ मंदिराजवळ चार ते पाच संशयित युवक बसलेले दिसले. पोलिसांनी वेढा घातल्यानंतर दोन आरोपी पसार झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अशी आहेत –
१) विजय उर्फ तात्त्या कोषीद हत्तीमारे (१९), रा. अलंकार नगर, अजनी
२) अंकीत उर्फ सरकार सुरज पाटील (३३), रा. शाहू नगर, मानेवाडा
३) अक्षय उर्फ मुंडी सागर शाहू (१९), रा. ताजनगर, अजनी
ताब्यातील आरोपींकडून २२ लोखंडी चाकू, एक लोखंडी होडा, नायलॉन दोरी, ५ मास्क, सर्जिकल हॅण्डग्लोज, टेप पट्टी, ४ मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (एमएच ४९ सीके १९३१) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण जप्तीची किंमत १ लाख ७६ हजार ५२५ रुपये इतकी आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (दक्षिण प्रभाग) शिवाजीराव राठोड, उप पोलिस आयुक्त (परि.क. ४) रश्मीता राव, सहपोलीस आयुक्त (सक्करदरा विभाग) नरेन्द्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वपोनि. ज्ञानेश्वर भेदोडकर, सपोनि. ओमप्रकाश भलावी, पोहवा. गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतन वैद्य, राजेश मोते, विजय सिन्हा, पोअं. राजेश धोपटे, मंगेश मडावी, प्रज्वल वाणी, रवि वंजारी, नितेश कडु व हिमांशु पाटील यांनी सहभाग घेतला.
हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा. दं. सं. कलम ३१०(४), ३१०(५) अंतर्गत गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.