Published On : Fri, Mar 15th, 2024

नागपूरच्या सायबर पोलिसांची कामगिरी; ऑनलाईन फसवणूक झालेली लाखोंची रक्कम मिळवण्यात मोठे यश!

Advertisement

नागपूर: फेक ट्रेडिंग अकाऊंटमध्ये फसवणूक झालेली रक्कम फिर्यादीस परत मिळवून देण्यास नागपूरच्या सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. फिर्यादी जयेशने (बदलले नाव) स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमविण्याची जाहिरात बघितली.यादरम्यान सायबर चोरट्यांनी जयेशला प्रशिक्षण देवून बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे पैसे गुंतवण्यास भाग पाडले. तसेच त्याची १९,९०,००० रुपयांनी फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयेशने सायाबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

सदर गुन्हयात सायबर पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास करून मनी ट्रेलचे विश्लेषण करून तात्काळ ज्या अकाऊंटमध्ये फिर्यादीचे पैसे गेले अशी ३ अकाऊंट गोठविले.

तसेच न्यायालयीन प्रक्रियेनंतर या प्रकरणात फसवणूक झालेली रक्कम फिर्यादी जयेशला मिळवून दिली.तसेच अज्ञात आरोपी विरोधात गु.र.क ११७/२०२३ कलम ४१९,४२०,४६७,४७१,१२०(ब)भादवि सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तापस सुरू केला आहे.