Published On : Fri, Mar 27th, 2015

मुंबई : काँग्रेस उमेदवार नारायण राणेंना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

narayan-rane-saheb
मुंबई। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री नारायण राणे यांना पीपल्स रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.प्रा.श्री जोगेंद्र कवाडे यांनी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.