Published On : Fri, Mar 27th, 2015

मुंबई : प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची बैठक

MPCC Parliamentary Board Meeting 02
मुंबई। राज्यात होऊ घातलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.

येथील गांधी भवनस्थित प्रदेश कार्यालयात आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण होते. निवड मंडळाचे सदस्य माजी प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते आ.श्री पतंगराव कदम, आ.श्री शिवाजीराव देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, इंटकचे अध्यक्ष श्री जयप्रकाश छाजेड, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, एनएसयुआयचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नवी मुंबई महानगर पालिका, औरंगाबाद महानगर पालिका, भोकर नगर परिषद, वाडी नगर परिषद, मोवाड नगर परिषद, वरणगाव नगर परिषद, राजगुरूनगर नगर परिषद, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. संबंधित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी निवड मंडळाला वर्तमान स्थानिक राजकीय परिस्थिती, जनसमस्या व संभाव्य उमेदवारांबाबत माहिती दिली.