Published On : Sat, Jun 12th, 2021

पेंच नवेगाव खैरी धरणात ९४.१०टक्के पाणीसाठा

आज दुपारी ०.३मिटर ने एक गेट उघडले,तर रात्री दोन गेट उघडण्याची शक्यता – उपविभागीय आभियंता प्रणय नागदिवे

पारशिवनी – तालुक्यातील नवेगांव खैरी धरण पेंच प्रकल्पा मध्ये उपविभागीय अभियंता ,व शाखा आभियंता यांचे व्दारे मिळाली माहिती प्रमाणे पेंच धरणात एकुण साठा १४१.९८४ दलघमी असुन आजच्या पाणी पातळी ३४२.४२ मीटर असुन आजचा साठा १२९.३२२ दलघमी असुन साठा ९४.०८ % टक्केवारी आहे आणि धरणाचे परिचलन आराखड्या नुसार पेंच प्रकल्पा मधुन आज शुक्रवारी दिनांक ११ जुन २०२१ ला दुपारी वेळ — १.००— वाजता एक दरवाजे ०.३मीटर (१फुट)ने उघडुन त्यामधुन एकुण विसर्ग ३१.६८ (क्युमेक) पानी पेंच नदी पात्रात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये सोडण्याण आला आहे .

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच या पुढे सुद्धा धरणात चा दोन गेट ०.३ मिटर गेट केव्हा ही पाण्याची पातळी वाढेल त्या नुसार नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल अशी माहीती पेच पाटबंधारे अ विभागिय आभियंता प्रणय नागदिवे व शाखा आभियंता विशाल दुपारे यांची सागींतले व यांची कृपया नोंद घेत पारशिवनी तालुक्यातील नरी काठा वरिल सर्व गावा मध्ये दवंडी द्वारे लोकांना तसेच नदी काठावरील नागरिकांना नदी पात्रात जाऊ नये व सतर्क राहण्याबाबत दक्षता व काळजी घेण्याबाबत कळविण्यात यावे तसेच जंगलात मारता गुरे , ढोरे , व इतर नुकसान होणार नाही याची दक्षता व काळजी घेण्याची विनंणी करण्यात येत असुन वरील सोडणात येणाऱ्या पुराचा पाण्यातुन लोकांना व गुरे ढोरे जाणे येणे करण्यात मनाई करण्यात येत आहे .

Advertisement
Advertisement