Published On : Wed, Mar 17th, 2021

घराबाहेर फिरणा-या कोरोनाबाधिताला दंड

Advertisement

बुधवारी १९ प्रतिष्ठानांवर कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १७ मार्च) रोजी १९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,४५,००० चा दंड वसूल केला. पथकानी ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच बाबा बुध्दाजीनगर येथील गृह विलगीकरणमध्ये राहणे आवश्यक असतांनाही कोरोनाबाधित रुग्ण घराच्या बाहेर फिरतांना आढळल्यामुळे त्याच्याकडून रु ५०००/- चा दंड आकारण्यात आला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisement
Advertisement