ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टिट्यूट च्या बालरोग विभागात सहा बालरोगतज्ञांचा सहभाग
बालरुग्णांसाठी आरोग्य शिबिर 2 ते 7 मार्च दरम्यान
नागपूर -रवि नायर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडद्वारा संचालित नागपूरातील स्थानिक ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टिट्यूट तर्फे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा दिली जाते. साठ विभागात कार्यरत असलेल्या या रुग्णालयात मध्यभारतातील गरजू मुलांच्या व मुदतपूर्व बाळांसाठी आरोग्य तपासणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ही सेवा सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत प्रदान करण्यात येत असून, सहा बालरोगतज्ञ ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टिट्यूट च्या या केंद्रावर सेवा प्रदान करीत आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यात लहान मुलांवर व नवजात शिशुंवर चोविसतास उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. तर रोगनिदान व लसीकरणासाठी सकाळी 9 ते रात्री 8 यावेळेत ओपीडीची सेवा सुरू असते. अविरत सुरू असलेल्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टिट्यूट च्या बालरुग्ण सेवेचे सेवेचे रुग्णांकडून स्वागत होते आहे. याचा अनेक गरजू परिवाराला सहाय्य झाले आहे.
डॉ. विठ्ठलराव दांडगे (एमडी, डीसीएच, एफआयएपी, एफआयसीएमसीएच) ओपीडीत सकाळी 9 ते 11 सेवा देतात. पेडियाट्रीक क्रिटिकल केअर विषयात फेलोशिप प्राप्त डॉ. विवेक शिव्हारे (एमबीबीएस, एमडी (बालरोगशास्त्र)) सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत सेवा देतात. इंटेन्सिव न्यूनटल केअर विषयात फेलोशिप प्राप्त डॉ. अंजु कडू (एमबीबीएस, डीसीएच) दुपारी 1 ते 4 यावेळेत सेवा देतात. पीआसीयु च्या फेलोशिप प्राप्त डॉ. रोहिणी गुल्हाने (एमबीबीएस) दुपारी 4 ते 6 यावेळेत सेवा देतात. डॉ. सचिन मुळे (एमबीबीएस, एमडी (बालरोगशास्त्र)) सायंकाळी 5 ते रात्री 8 यावेळेत सेवा देतात. शिवाय डॉ. तुषार ठाकरे (एमबीबीएस, एमएस, एमटेक (बालरोग सर्जन)) दुपारी 2 ते 4 यावेळेत नियमित सेवा प्रदान करतात.
ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टिट्यूट ने स्वत:चे प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी सातत्याने पोषणासंबंधीच्या आजारांचा व सर्दी ताप अशा समस्यांचा सामना करणाऱ्या बालरुग्णांसाठी बालरुग्ण आरोग्य केंद्राने सेवांमध्ये वाढ केली आहे. अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे अथवा सातत्याने प्रकृती बिघडत असलेल्या बालरुग्णांसाठी आरोग्य सप्ताहाचे आयोजन 2 मार्च ते 7 मार्च 2020 दरम्यान करण्यात आले आहे. उपचार घेऊ इचिछणाऱ्या बालरुग्णांचे नोंदणी शुल्क 135 रुपये निश्चित करण्यात आले असून, बालरोग क्षेत्रातील नावाजलेले तज्ञ बालरुग्णांवर उपचार करणार आहेत. आपल्या पाल्यांची तपासणी करून घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी 9372332910 या क्रमांकावर प्रीयाला संपर्क साधावा असे आवाहन ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टिट्यूट ने केले आहे.
