Published On : Mon, Aug 28th, 2017

पवार म्हणाले, अाता नवा मालक बघा; गडकरींचे उत्तर, मी तुमचाच अॅम्बेसेडर

3

पुणे : “१९७४ राज्याचा कृषिमंत्री होतो तेव्हापासून जवळपास ४३ वर्षे तुमच्या अधिवेशनाला मी आलोय. सालकरीसुद्धा एवढी वर्षे टिकत नसतो. म्हटलं तुम्हाला नवीन मालक बघावा. म्हणून मी येणार नव्हतो,‘ हे उद््गार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “मी महाराष्ट्राचा अॅम्बेसेडर म्हणून दिल्लीत आहे. कुठलीही अडचण सांगा. मी मदत करेन.’ पवारांच्या वक्तव्यानंतर हलका हशा पिकला तर गडकरींच्या वक्तव्यावर टाळ्या पडल्या.

रविवारी पुण्यात झालेल्या राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ५७ व्या वार्षिक अधिवेशनात हा प्रसंग घडला. गडकरींच्या हस्ते अधिवेशनाचे उद‌्घाटन झाले तर पवार अध्यक्षस्थानी हाेते. ‘मी आज येणार नव्हतो १९७४ मध्ये कृषिमंत्री असताना मी पहिल्यांदा तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो.

अाता वाटले शेतीविषयी आस्था असणारे गडकरी येत आहेत. मग फारशी चिंता करण्याचे कारण नाही. कारण कोणतीही गोष्ट एकदा ठरवली की ती पूर्ण करण्यासाठी झटण्याचा त्यांचा स्वभाव आहे,’ असे पवार म्हणाले.