उमेशबाबू चौबे मार्ग व घाट रोड रेल्वे पुला जवळील वाहतुकीचा खोळंबा
नागपूर: कॉटन मार्केट परिसरात आधीच वाहनांची वर्दळ त्यातच उन्हाचा तडाका अशा भर उन्हात मध्य रेल्वेने बुधवारी रेल्वे अंडर ब्रिजच्या (आरयुबी) निरीक्षणाचे काम हाती घेतले. निरीक्षणादरम्यान सुरक्षेच्या दुष्टीकोणातून आरयुबीच्या एका भागातील वाहतून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल ४५ मिनीटे चाललेल्या निरीक्षणामुळे कॉटन मार्केट परिसरातील रेल्वे पुल आणि धंतोली येथील घाट रोड पुलाजवळ वाहतूकीचा खोळंबा झाला.
मध्य रेल्वे नागपूर विभागाअंतर्गत मागील एक वर्षापूर्वी उमेशबाबू या मार्गावर रेल्वेने गर्डर घालून आरयुबी मार्ग तयार केला. या पुलावरून दररोज मुंबई मार्गाने ५० पेक्षा अधिक गाड्यांची वाहतूक होते. पुलाच्या देखरेखीची जबाबदारी एका खासगी कंपनीला देण्यात आली. संबंधीत कंपनीद्वारे वषार्तून दोनदा पुलाचे निरीक्षण करण्यात येते. दरम्यान बुधवारी या पुलाचे वार्षिक निरीक्षण करण्यात आले.
लहान क्रेनच्या मदतीने पुलाच्या खालील भागाचे निरीक्षण करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने ये-जा करणाºया वाहनांसाठी केवळ एक मार्ग बंद करण्यात आला. दुपारी १.१५ वाजता निरीक्षणाला सुरूवात झाली. पाऊन तास म्हणजे ४५ मिनीटे निरीक्षण सुरू होते. त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. परिणामी कॉटन मार्केट चौक ते मोक्षधाम घाट, शनि मंदीर ते बर्डी मार्ग, धंतोली ते घाट रोड व घाट रोड ते बर्डी मागार्ने जाणाºया वाहन चालकांना वाहतुकीच्या कोडींत अडकावे लागले.
सुरक्षितेच्या दृष्टीने निरीक्षण
रेल्वे पुल सुरक्षिता ठेवण्याच्या उद्देशाने वषार्तून दोन ते तीन वेळा निरीक्षण केले जाते. निरीक्षणाकरीता जवळपास ४५ मिनिटांचा वेळ लागतो. असे मध्य रेल्वे नागपूर विभागाचे सहा वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी सांगितले.