Published On : Tue, Nov 13th, 2018

कन्हान ला पत्रकार भवन बनविण्यात यावे

सामाजिक कार्यकर्ता संदीप शेंडे यांचे निवेदन

कन्हान : – नगरपरिषद कन्हान – पिपरी प्रशासनाने नागरिकांच्या समस्याना वाचा फोडण्याकरिता , शासनाच्या विविध योजनांची माहीती सर्वसामान्यापर्यत पोहचविच्या दुष्टीकोनातुन कन्हान ला पत्रकार भवन बनविण्यात यावे तसेच वृत्तपत्र वाटप करण्याकरिता व्यवस्थित जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता संदीप शेंडे हयानी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन केली आहे .

नागरिक, शासन, प्रशासन यांच्या समस्या , तक्रारी न निराकरणाच्या दुष्टीकोनातुन पत्रकारासोबत सुसंवाद साधने सोयीस्कर व्हावे तसेच सर्व वर्तमान पत्र व पत्रकार एकाच स्थळी उपलब्ध व्हावे जेणे करून नागरिकांच्या समस्याना वाचा फोडण्याकरिता , शासनाच्या विविध योजनांची माहीती सर्वसामान्यापर्यत पोहचविच्या दुष्टीकोनातुन कन्हान ला पत्रकार भवन बनविण्यात यावे.

तसेच हिवाळा , उन्हाळा, पावसाळयात पहाटे सकाळी सर्व वृत्तपत्र व्यवस्थित संकलित करण्या करिता व्यवस्थित जागा नगरपरिषदेने उपलब्ध करून देण्यात यावी जेणे करून संपुर्ण शहरात नियमित वृत्तपत्र वाटप करणे सोयीस्कर होईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता संदीप शेंडे आणि मित्र परिवारा व्दारे नगरपरिषद कन्हान-पिपरी चे नगराध्यक्ष मा. शंकर चहांदे व मुख्याधिकारी सतिश गांवडे हयाना निवेदना व्दारे करण्यात आली आहे . तसेच पत्रकारांना सरकार तर्फे मानधन सुध्दा देण्यात यावे अशी सरकार दरबारी विनती करण्यात आली आहे .