पटोले, वासनिक व उसेंडी काँग्रेसचे उमेदवार

Advertisement

नागपूर : नागपुरातून भंडारायाचे माजी खासदार नाना पटोले यांचेही तिकीट पक्के झाले आहे.तर रामटेक लोकसभा मतदार संघातून मुकूल वासनिक पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवार यादी अद्याप जाहीर झालेली नाही.तर गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातून २०१४ चे पराभूत उमेदवार नामदेव उसेंडी यांनाच परत रिंगणात उतरविल्याचे वृत्त आहे.

२००९ मध्ये रामटेक लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे वासनिक यांनी शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना पराभूत केले होते. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेत तुमाने यांनी पराभवाचे उट्टे काढत वासनिक यांना १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकला होता.

Advertisement
Advertisement

यावेळी रामटेकच्या जागेवर काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनीही दावा केला होता. मात्र, वासनिक यांनाच केंद्रीय निवड समितीने पसंती दिली. जिल्हा व प्रदेश काँग्रेसनेही वासनिक यांच्याच नावाची शिफारस करणारा अहवाल अ.भा. काँग्रेस कमिटीकडे पाठविला होता. १९७७ ते २०१४ या ३७ वर्षांतील १२ निवडणुकांवर नजर टाकली तर आठवेळा काँग्रेस आणि चारवेळा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे.

यावेळी वासनिक ‘भगवाङ्क उतरवून रामटेकचा गड सर करतात का, याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement