Published On : Sun, Mar 17th, 2019

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डाॅ.फुके भाजपचे उमेदवार

गोंदिया: एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांचे नाव पार्लेमेंटरी बोर्डाने मंजूर केल्याचे वृत्त सुत्रांनी दिले आहे.फुके हेच या मतदारसंघातील भाजप-सेना आघाडीचे उमेदवार राहणार असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यापध्दतीचे संदेश पोचते करण्यात आले आहेत,मात्र भाजपकडून अधिकृतरित्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

मात्र या निवडणुकीतील उमेदवारीच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराच्यावतीने मात्र फुके यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात आले आहे.भाजपच्या पार्लेमेंटरी बोर्डाकडे महाराष्ट्र भाजपने डाॅ.परिणय फुके,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे व भंडारा नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या नावाची शिफारस केली होती.भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा ही वर्धा मतदारसंघातील उमेदवारवर अवलंबून राहणार होती.त्याठिकाणी भाजपने रामदास तडस यांनाच पुन्हा रिंगणात उतरविण्याची तयारी दर्शविली असून सागर मेघे यांनी लढण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

Advertisement

जर वर्धेतून एैनवेळी सागर मेघे रिंगणात राहिले तरच भंडारा-गोंदियातील उमेदवार बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही.फुके उमेदवार होण्याची चिन्हे येताच भाजपशी संबधित सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते हे बैठकासांठी पुढे येऊ लागले असून बैठकांनाही सुरवात केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement