
नागपूर : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या पानीपत रिफायनरीतील इथेनॉल प्रकल्पांबाबत आरटीआयमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पानीपत येथे कंपनीने तब्बल १,६६३ कोटी रुपये खर्चून दोन इथेनॉल प्रकल्प उभारले आहेत.
आरटीआयच्या उत्तरानुसार, २जी इथेनॉल प्रकल्पासाठी ९०९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ३ कोटी लिटर आहे. या प्रकल्पात इथेनॉल निर्मितीसाठी धानाच्या पेंढ्याचा वापर केला जातो. हा प्रकल्प २३ एप्रिल २०२३ रोजी कार्यान्वित झाला.
तर ३जी इथेनॉल प्रकल्पावर ७५४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्याची वार्षिक क्षमता ४.२ कोटी लिटर आहे. या प्रकल्पासाठी ऑफ-गॅसचा वापर केला जातो. हा प्रकल्प २८ मार्च २०२३ रोजी सुरू झाला.
मात्र, दोन्ही प्रकल्पांमधून प्रत्यक्षात दरवर्षी किती इथेनॉल उत्पादन झाले, याची माहिती IOCLने व्यावसायिक गोपनीयतेचा हवाला देत देण्यास नकार दिला आहे.




