Published On : Thu, Oct 19th, 2017

पंढरपुरात दिवाळीनिमित्त विठ्ठल-रखुमाईला दागिन्यांचा साज


पंढरपूर : दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात नरकचतुर्दशीला विठ्ठल रुक्मिणी सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांनी नटले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या संपामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मात्र मंदिरात भाविकांचा शुकशुकाट आहे.

दरवर्षी दिवाळीला विठ्ठल भक्त देवाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात, मात्र एसटी बसचा संप असल्याने भाविकांना पंढरपूरपर्यंत पोहचणं कठीण झालं आहे. स्थानिकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

सध्या रेल्वे गाड्या मात्र भरभरुन येत असून खाजगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होताना दिसत आहे. आज दिवाळीसाठी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दिवाळीत देवाला सोन्याच्या विविध दागिन्यांनी मढवले जाणार आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement