Published On : Mon, Apr 9th, 2018

सीताबर्डीतील लॉजमध्ये युवकाची विष पिऊन आत्महत्या

poison

Representational Pic


नागपूर: सीताबर्डी भागातील लॉजवर पांडेले आऊट मधील एका रहिवाशाने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.

श्याम विजय भोयर (३१) याने रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता सीताबर्डी येथील मोदी नं. ३ मधील अग्रवाल लॉजच्या खोली क्र. १०४ मध्ये विषारी पदार्थाचे सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली. मात्र आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. श्याम भोयर हा पांडे लेआऊट येथील अमित अपार्टमेंटच्या फ्लॅट नं. १०४ मध्ये राहत होता.

यासंदर्भात गोकुळपेठ मधील रहिवासी विनोद गौरसीलाल अग्रवाल (७०) यांनी दिलेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.