Published On : Tue, Jan 30th, 2018

पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचं निधन

Advertisement

नवी दिल्ली – पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचं दिल्लीत निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघातून ते निवडून आले होते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. चिंतामण वनगा यांच्या छातीत दुखत असल्याने सोमवारी त्यांना आर एम एलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चिंतामण वनगा तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1999 मध्ये ते डहाणू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तर 2014 मध्ये पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पराभूत करुन खासदार झाले.