Published On : Thu, May 31st, 2018

पालघरमध्ये भाजपाचा दणदणीत विजय; शिवसेनेच्या पदरी निराशाच

Advertisement

Rajendra Gavit
पालघर: पालघर लोकसभा पोटनिडवणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला आहे.

या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. दुपारी एक पर्यंत राजेंद्र गावित यांना 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मिळाली. तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे 2 लाख 9 हजार मतांसह दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. मतमोजणीच्या अजून काही फेऱ्या शिल्लक आहेत. मात्र गावित हे जवळपास 28 हजार मतांनी आघाडीवर असल्याने, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

दुपारी 12 पर्यंत झालेल्या 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी जवळपास 20 हजारांची आघाडी मिळवली होती. तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही सुरुवातीला तिसऱ्या स्थानावर होते, नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले.

पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली.

पालघर पोटनिवडणूक निकालामध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून भाजपने आघाडी घेतली आहे.