
नागपूर : दुबईत सुरू होणाऱ्या आशिया कपमधील भारत-पाक सामना लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने रविवारी राज्यभर आंदोलन छेडले. केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करताना उद्धव गटाने केलेल्या या आंदोलनावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
बावनकुळे म्हणाले, “पाकिस्तानी झेंडा फडकवणारे आम्हाला देशभक्ती शिकवू नयेत. ऑपरेशन सिंधूरच्या काळात प्रश्न उपस्थित करणारे आता राजकीय फायद्यासाठी क्रिकेटचा वापर करत आहेत.”
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानी झेंडा फडकवला होता. ते पाप शिवसेनेने केले. नरेंद्र मोदींनी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून भारताचे नाव जागतिक स्तरावर उजळत आहे. मात्र, उद्धव ठाकरे क्रिकेटच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचत आहेत.”
बावनकुळे यांनी ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरूनही निशाणा साधला. ऑपरेशन सिद्धूरच्या वेळी देशावर हल्ला झाला, तेव्हा उद्धव ठाकरे परदेशात पर्यटनावर होते. त्या घटनेनंतरही ते लंडनमध्येच थांबले. हिंदू आणि देशाबद्दल त्यांना कोणतीही सहानुभूती नाही, हेच यातून स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.
शेवटी बावनकुळे यांनी ठाकरेंना थेट सवाल केला की, आपल्या सभांमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवले गेले होते का? याचे उत्तर त्यांनी देशाला द्यावे.








