Published On : Wed, Mar 18th, 2020

पडसाड ग्रा प च्या महिला सरपंच विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

Advertisement

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पडसाड ग्रा प ची 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकित सरपंच हे थेट जनतेतून निवडून आले होते यानुसार सात सदस्य व सरपंच अशी ग्रामपंचायत चा कारभार सुरू असताना निवडून आलेल्या महोला सरपंच उज्वला भीमराव पाटील ह्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बहुमताच्या विरोधात काम करोत असल्याने ग्रा प च्या सातही सदस्यांनी सरपंच उज्वला पाटील विरोधात एकमताने अविश्वास प्रस्ताव तहसोलदार अरविंद हिंगे यांच्याकडे सादर केले होते यासंदर्भात आज 18 मार्च ला दुपारी 2 वाजता पीठासीन अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली पडसाड ग्रा प कार्यालयात अविश्वास प्रस्तावाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत उपस्थित सात ग्रा प सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव संदर्भात सहमत दर्शविल्याने सरपंच विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजुर करण्यात आला.

सरपंच उज्वला भीमराव पाटील ह्या 25 ऑक्टोबर 2017 ला थेट जनतेतून निवडून आले होते मात्र हे सरपंच पदाचा पुरेपूर एकलशाही पद्धतीने वापर करीत असून इतर सदस्यांना विश्वासात न घेता इतर ग्रा प सदस्यांच्या बहुमताच्या विरोधात काम करीत असल्याने ग्रा प सदस्य प्रशांत झाडे, कल्पना टाले, जितेंद्र डाफ, कांता गावंडे, प्रियंका राऊत, आशिष मांनवटकर, रंजना माटे यांनी सरपंच विरोधात अविश्वास प्रस्ताव तहसीलदार कडे मंजूर करून घेतले.

संदीप कांबळे कामठी