| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Nov 27th, 2020

  नागपुरात मेहुण्याने केली जावयाची हत्या

  नागपूर : घरगुती वादातून मेहण्याने त्याच्या जावयाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल धरमदास सहारे (वय ५८) असे मृतकाचे नाव आहे. ते कुंभारपुऱ्यातील बारसे नगरात राहत होते.

  त्यांचा मेहुणा आरोपी विकास गुणवंत साखरे (वय ३२) यांच्यासोबत गुरुवारी रात्री अतुल यांचा वाद सुरू झाला. दोघे एकमेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले. पाहता पाहता ते हाणामारीवर आले.

  आरोपी विकास साखरेने अतुल सहारे यांना खाली पडले आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर, छातीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावली पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजेश अतुल सहारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विकास साखरे विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145