Published On : Tue, Aug 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पचमढीतील नागद्वार यात्रेदरम्यान नागपूरच्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Advertisement

Auto Draft

नागपूर : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ पचमढी येथील नागद्वार यात्रेसाठी गेलेल्या नागपूरच्या ३२ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृताची ओळख सक्करदरा परिसरातील ओमनगर येथील सुमित मानकर अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित शनिवारी काही मित्रांसह चारचाकी वाहनाने नागद्वार यात्रेसाठी पचमढीला रवाना झाला होता. रविवारी मित्रांसोबत दर्शनासाठी जात असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याला अस्वस्थ आणि घाबरल्यासारखे वाटू लागले. काही वेळातच तो जमिनीवर कोसळला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मित्रांनी तातडीने सुमितला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुमितच्या मृत्यूची माहिती नागपुरातील कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. धार्मिक यात्रेसाठी आनंदाने घराबाहेर पडलेला सुमित पुन्हा परतणार नसल्याने कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

ओमनगर परिसरातही सुमितच्या मृत्यूची बातमी पसरताच शोककळा पसरली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याचे मित्र आणि परिचितही हादरले आहेत. धार्मिक यात्रेचा आनंद काही क्षणांतच दुःखात बदलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.